का काढून घेतेय सरकार गरीबांच्या आयुष्यातील गोडवा ?- सुप्रिया सुळे

supriya sule

मुंबई: गरीबांच्या आयुष्यातील गोडवा सरकार का काढून घेतय? असा प्रश्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थित केला आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पूर्वीप्रमाणे साखर देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळून लावला असल्यामुळे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना रेशन दुकानांवर साखर मिळणार नाही. या निर्णयाचा राज्यातील ४५ लाख कुटुंबांना फटका बसणार आहे.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, महागाईमुळे गरीबांच्या आयुष्यात केवळ रेशन दुकानांत मिळणाऱ्या साखरेमुळे गोडी होती. पण केंद्र सरकारने राज्याचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे आता रेशन दुकानात साखर मिळणार नाही. अंत्योदयच्या लाभधारकांचीही साखर महागणार आहे. गरीबांच्या आयुष्यातील गोडवा सरकार का काढून घेतेय ?

तसेच अंत्योदय योजनेतील गरीब कुटुंबांना रेशनवर मिळणाऱ्या साखरेचे दर वाढवले असल्यामुळे अंत्योदय योजनेतील कुटुंबांना रेशनवर एक किलो साखर २० रुपयांना मिळणार आहे. पूर्वी एक किलो साखर १५ रुपयांना मिळत होती. याबाबत माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेतील लेखी उत्तरात दिली.