कोकण च्या विकासासाठी राजकीय जोडे काढणार ; उद्धव ठाकरे

modi-uddhav

टीम महाराष्ट्र देशा : मेक इन इंडियाच्या धोरणामुळे कोकणची राख करून गुजरातमध्ये विकासाची रांगोळी काढली जाणार आहे, मात्र असा विकास शिवसेना सहन करणार नाही. मुंबईतील आर्थिक केंद्र आणि बुलेट ट्रेन गुजरातमध्ये नेणाऱ्यांनी रासायनिक प्रकल्प मात्र आमच्या माथी मारला आहेत. अशी टीका करत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले.

वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये झालेल्या ग्लोबल कोकण महोत्सवात उद्धव ठाकरे बोलत होते, जैतापूर प्रकल्पाच्या पाठोपाठ राजापूरमध्ये आता रिफायनरी उभी राहत आहे. त्यामुळे कोकणच्या सौंदर्याचा नाश होणार असून जे चांगले आहे ते नष्ट होणार आहे. तर याला विकास म्हणता येणार नाही. इस्राईलने वाळवंटात शेती केली, असा उल्लेख जगात होतो. मात्र यापुढे महाराष्ट्राने हिरवळीचे वाळवंट केले, असे बोलले जाईल. हे सर्व थांबायचे असेल आणि कोकणचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल, तर राजकीय जोडे काढून तुमच्याबरोबर येण्याची माझी तयारी आहे. मेक इन इंडियाच्या नावाखाली आपल्याला सध्या विकासाची स्वप्ने दाखविली जात आहेत. असे बोलत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्न चिन्ह निर्माण केले.