भांडारकर प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या सर्व 72 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता

'जेम्स लेन'प्रकरणानंतर करण्यात आली होती तोडफोड

पुणे : भांडारकर संस्थेतील तोडफोड प्रकरणात पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय दिला आहे. पुणे सत्र न्यायालयाने संभाजी ब्रिगेडच्या सर्व 72 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.‘शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बदनामीकारक लिखाण करणाऱ्या जेम्स लेनला भांडारकर संस्थेतील 12 जणांनी मदत केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने आरोप करत 5 जानेवारी 2004 रोजी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. या प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या 72 कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करुन त्यांना आरोपी करण्यात आलं होत.

bagdure

दरम्यान हा खटला सुरु असताना आरोपींपैकी ४ जणांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे  उर्वरित ६८ जणांच्या विरोधात हा खटला सुरु होता . हा हल्ला संभाजी ब्रिगेडनेच केला हे सरकारी पक्ष सिद्द न करू शकल्याने सर्वांची मुक्तता करण्यात आली आहे .

 

You might also like
Comments
Loading...