चंद्रकांत मोकाटे-महादेव बाबर यांची पुणे शहर शिवसेनेच्या प्रमुखपदी निवड

टीम महाराष्ट्र देशा – शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांनी शहरप्रमुख पद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर शिवसेनेचा नवा शहरप्रमुख कोण असणार याबद्दल बरेच अंदाज लावले जात होते अखेर पुणे शहर शिवसेनेच्या शहरप्रमुख पदाची माळ माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि महादेव बाबर यांच्या गळ्यात पडली आहे तर युवा सेनेचे शहरप्रमुख यांच्या किरण साळी यांची उपशहरप्रमुख पदी वर्णी लागली आहे. या संदर्भात मुंबईमध्ये थोड्याच वेळापूर्वी निर्णय झाला आहे. मोकाटे यांच्याकडे कोथरुड, शिवाजीनगर, कसबा, पर्वती तर बाबर यांच्याकडे हडपसर, कॅंटोन्मेंट, वडगांवशेरी, खडकवासला या चार विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. युवसेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावल्यामुळे तसेच युवकांशी दांडगा जनसंपर्क असलेल्या किरण साळी यांच्यावर पक्षनेतृत्वाने विश्वास दाखवत त्यांना बढती देत उपशहरप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे तर पुणे शहर शिवसेना सहसंपर्क प्रमुखपदाची जबाबदारी अजय भोसले आणि प्रशांत बधे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.