रोहित शर्माला उपकर्णधार पदावरून हटवा; विराटचा निवड समितीला प्रस्ताव

virat

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू व संघाचा कर्णधार विराट कोहली आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारताच्या टी 20 कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचे टी 20 कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर या चर्चेवर पडदा पडला आहे. विराट कोहलीने ट्विटरवरून टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर T20 टीमचे कर्णधारपद सोडणार असल्याची माहिती दिली.

विराट कोहलीने T20 विश्वचषक स्पर्धा तोंडावर आलेली असताना कर्णधारपद सोडत असल्याचं जाहीर केलं आणि क्रिकेट जगतात खळबळ उडाली. विराटने स्वतःला थोडी स्पेस देऊ इच्छित असल्याचं सांगत T20 टीमचं कर्णधारपद सोडणार असल्याचं स्पष्ट केलं.

विराट कोहलीने आगामी टी २० वर्ल्ड स्पर्धेनंतर कर्णधारपद सोडण्याच्या घोषणेनंतर आता इंडियन टीमच्या ड्रेसिंग रूममधून एक मोठी माहिती समोर येत आहे. विराटने भारतीय संघाच्या निवड समितीला रोहित शर्माला उपकर्णधार पदावरून हटवण्याचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त समोर आहे. या वृत्ताने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.

भारतीय निवड समितीने विराटने सादर केलेल्या रोहित शर्माबाबतच्या प्रस्तावाबाबत खूपच आश्चर्य व्यक्त केले आहे. या प्रस्तावात विराटने रोहितला एकदिवसीय सामन्यांच्या उपकर्णधार पदावरून हटविण्यात यावे अशी मागणी केली होती. या प्रस्तावात रोहितचे वाढलेले हे कारण देण्यात आले होते. आणि रोहितच्या ऐवजी उपकर्णधार पदाची जबाबदारी ही केएल राहुलला द्यावी अशीही मागणी प्रस्तावातून विराटने निवड समितीकडे केली होती. मात्र, विराटने दिलेला हा प्रस्ताव निवड समितीला पटला नसल्याचे कळते आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहलीचा प्रस्ताव एकुणच निवड समितीला पटलेला नाही. त्यामुळे निवड समितीच्या सदस्यांनीही याबाबतची नाराजी व्यक्त केली असल्याचे कळते.

महत्त्वाच्या बातम्या