Share

Raees Shaikh । “इक्बाल चहल यांना आयुक्तपदावरून हटवा”; रईस शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Raees Shaikh । मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर असतानाच अजून एक मोठी बातमी समोर येत आहे. इक्बाल चहल यांना मुंबई पालिकेच्या आयुक्तपदावरून हटवा अशी मागणी समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मुंबई महापालिकेतील 12 हजार कोटींच्या निविदांची चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी इक्बाल चहल यांना पदावरून हटवा अशी मागणी करतआमदार रईस शेख (Raees Shaikh) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) साथीच्या आजारामुळे लॉकडाऊन दरम्यान केलेल्या 12,000 कोटी रुपयांच्या निविदांची चौकशी करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्याने विरोधी पक्षांच्या सदस्यांनी इक्बाल सिंग चहल यांना त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. ही चौकशी कॅग (Comptroller and Auditor General of India)च्या वतीने करण्यात येणार आहे.

“कॅग बीएमसीच्या अनेक विभागांची चौकशी करणार आहे आणि ज्या अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले होते ते अधिकारी अजूनही त्याच प्रशासकीय पदांवर कार्यरत आहेत. जोपर्यंत चौकशी सुरू आहे तोपर्यंत त्यांची अन्य विभागात बदली करण्यात यावी जेणेकरून तपासाच्या निष्पक्षतेवर परिणाम होणार नाही. जर हे अधिकारी त्यांच्या पदांवर कायम राहिले, तर त्यांच्याकडूनही चौकशीत फेरफार होण्याची शक्यता आहे,” असं शेख यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना म्हंटलं आहे.

शेख पुढे म्हणाले, आता कॅगची चौकशी होणार असल्याने ज्या व्यक्तीच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, त्याला आयुक्त आणि प्रशासक म्हणून राहू देऊ नये. बीएमसीमध्ये आयुक्त म्हणून दोन वर्षांहून अधिक काळ पूर्ण झाल्यामुळे आणि प्रशासकाचा कार्यकाळही संपला असल्याने या अधिकाऱ्याची आता त्यांच्या पदावरून बदली झाली पाहिजे. या संदर्भात पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

Raees Shaikh । मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर असतानाच अजून एक मोठी बातमी समोर येत आहे. इक्बाल चहल यांना …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now