करमाळा- युवा सेनेचे शहरप्रमुख विशाल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज शंभर युवकांनी युवा सेनेत प्रवेश करून येणाऱ्या काळात आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करणार असल्याची शपथ घेतली. युवा सेनेचे राज्य विस्तारक विपुल पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली करमाळा तालुका युवा सेनेचा मेळावा घेण्यात आला यावेळी व्यासपीठावर युवासेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्निल बागल उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे माजी शहरप्रमुख संजय शीलवान उपजिल्हाप्रमुख युवासेना मयूर यादव युवा नेते डॉक्टर अमोल घाडगे, युवा सेनेचे करमाळा तालुका समन्वयक शंभूराजे फरतडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आज युवा सेनेच्या पदाधिकारी बैठकीस मेळाव्याचे स्वरूप आले होते. आज या मेळाव्यात दुसरी रोशेवाडी हिवरवाडी पिंपळवाडी वडगाव या गावातील शेकडो युवकांनी युवा सेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांचे हातात शिवबंधन बांधून विपुल पिंगळे यांनी स्वागत केले. यावेळी बोलताना विपुल पिंगळे म्हणाले की विशाल गायकवाड यांनी युवा सेनेची जबाबदारी घेतल्यानंतर करमाळा तालुक्यात युवासेना झपाट्याने वाढत आहे. येणाऱ्या काळात सुद्धा प्रत्येक निवडणुकीसाठी युवासेनेच्या सैनिकांनी तयार व्हावेत यासाठी आतापासूनच घर तेथे शिवसैनिक वार्ड तिथे शाखा अन्याय तिथे युवासैनिक अशी त्रिसूत्री वापरून युवा सेनेचे काम वाढवावे.
यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की युवा सेना ही तरुणांची एक मोठी ताकद तालुक्यात निर्माण होत असून या तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असून युवा सेनेचे सैनिकाला काम करताना जिथे अडचण येईल तेथे शिवसैनिक खांद्याला खांदा लावून बरोबर येतील असे आश्वासन दिले. विपुल पिंगळे यांच्या आदेशानुसार तालुक्यातील 118 गावात युवा सेनेचा शाखा काढणार असल्याचे युवा सेनेचे तालुकाप्रमुख एडवोकेट कानतोडे यांनी सांगितले.
यावेळी तालुका समन्वयक शंभूराजे फरतडे यांनी युवासेनेने गेल्या वर्षभरात केलेल्या कामाचा आढावा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पुढे मांडला व इथून पुढे प्रत्येक निवडणुकीसाठी युवा सैनिक तयार करू त्यादृष्टीने आत्तापासूनच आम्ही काम करत असल्याचे सांगितले. यावेळी विशाल गायकवाड यांनी करमाळ्यातील शिवसेनेच्या वतीने सुरू असलेल्या भोजन योजनेतील कारभारामुळे शिवसेनेचे प्रतिमा खराब होत असून या भ्रष्टाचारी पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करावी अशी मागणी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री ठाकरेंना दिल्या पंतप्रधान मोदींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले…
- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले विधान दुर्दैवी
- आसाम मिझोराम सीमावादातून हिंसाचार, आसामच्या 6 पोलिसांचा मृत्यू
- ‘शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत रिंग रोडची मोजणी करून देणार नाही’
- ‘मुंबई इंडियन्स ते कसोटी संघात स्थान’ अवघ्या पाच महिन्यात बदलली सुर्याचे कारकिर्द