मुंबई: काही आठवड्यापूर्वीच मुंबईच्या पोलीस आयक्तपदी नियुक्त झालेले संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांच्या नियुक्तीवरून भाजपने सवाल खडा केला आहे. काल (८ मार्च) विधानभवनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठा गौप्यस्फोट केला. तब्बल सव्वाशे तासांचं व्हिडीओ फूटेज आपल्याकडे असल्याचा दावा करत फडणवीस यांनी यातल्याच एका व्हिडीओ क्लिपमध्ये संजय पांडे यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती कोणत्या बोलीवर करण्यात आली आहे? असा सवाल केला. तर आता यावरूनच भाजप नेते अमित साटम ( Amit Satam) यांनी संजय पांडे यांना पोलीस पदावरून हटवण्याची मागणी करत थेट ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.
दोन दिवसांपूर्वीच अमित साटम यांनी फेसबुक माध्यमातून सांगितले होते की, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे एक ब्रीफ घेऊन आपल्या खुर्चीवर बसले आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट करण्याचे ब्रीफ त्यांच्याकडे आहे. काल सायंकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्यात पब्लिक प्रोसेक्युटर चव्हाण हे बोलताना आढळत आहेत की, पांडे FIR करतील. पांडे यांनी त्याच बोलीवर खुर्चीवर बसवले आहे. त्यामुळे हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मी केलेले आरोप सिद्ध झाले आहेत. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात थोडी जरी लोकशाही राहिली असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री वळसे पाटील यांनी ताबडतोब संजय पांडे यांना घरी पाठवण्याचे काम करावे. अन्यथा जनता तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही.”, असा इशारा अमित साटम यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
Maharashtra Session 2022 : फडणवीसांनी केलेल्या ‘त्या’ आरोपानंतर सत्ताधाऱ्यांची आज भूमिका कोणती?
-
WTC सुरु असताना सामना ड्रॉ केल्यामुळे क्रिकेट रसिक संतापले; पॅट कमिन्सने दिली मोठी प्रतिक्रिया
-
भारतीय क्रिकेटच्या प्रगतीत पवारांचे महत्वाचे योगदान! बीसीसीआयच्या माजी पदाधिकाऱ्यांचे वक्तव्य
- वंचित बहुजन आघाडीकडून मुस्कान खानचा सत्कार करण्याचे जाहीर, भाजपचा विरोध