दानवेंना साल्याची सालेगिरी दाखवायलाच हवी! -आमदार बच्चू कडू

शेतकऱ्यांबद्दल अपशबद्ध काढला तर याद राखा!

अकोला: “दानवेंनी शेतकऱ्यांना साले म्हणून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. त्यामुळेच दानवेंना साल्याची सालेगिरी दाखवायलाच येथे आलो आहे. दानवे कसी गली की खसखस है, यापुढे शेतकऱ्यांबद्दल अपशबद्ध काढला तर याद राखा तुमच्या घरात घुसून आसूड ओढळल्याशिवाय राहणार नाही”. अशा कणखर शब्दात प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी इशारा दिला.

आमदार बच्चू कडू यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी ते जालना जिल्ह्यातील भोकरदन अशी आसुडयात्रा काढली आहे या यात्रेंतर्गत अकोल्यात झालेल्या युवा संवाद मेळाव्यात बोलतांना बच्चू कडू यांनी अशोक चव्हाण, अजित पवार, राज ठाकरे, शिरीष महाजन आणि खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

दरम्यान, आसूड यात्रेचा समारोप भोकरदन येथे करण्यात आला. त्यावेळी बच्चू कडू यांनी खासदार रावसाहेब दानवे यांनी नोटबंदीच्या काळात मुलाच्या लग्नावर २०० कोटीची उधळपट्टी केली. नोटबंदीच्या काळात येवढा पैसा दानवेंनी कोठून आणला याचा हिशोब दानवे व भाजपने जनतेला द्यावा. अशी मागणी केली.

You might also like
Comments
Loading...