आद्य क्रांतिकारक वासुदेव फडके यांच्या स्मारकाची दुरावस्था…

महाराष्ट्र देशा स्पेशल
अक्षय पोकळे:- महाराष्ट्रात स्मारक आणि त्यावरून होणारे राजकारण आणि वाद हे काही नवीन नाही. परंतु जी स्मारकं आता सध्य स्थितीत उभी आहेत त्यांच्याकडे होणारे दुर्लक्ष ही देखील तितकीच चितेची बाब आहे. यातील एक आहे ते म्हणजे पुणे महापालिकेच्या हद्दित असलेले आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे हुतात्मा स्मारक.
पुणे पालिकेच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभारामुळे आज फडकेच्या स्मारकाची अत्यंत बिकट अशी दुरावस्था झाली आहे.भारतीय स्वातंत्र्य चळवळीत फडकेंच योगदान मोठं आहे त्यांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा उभारला होता.पण, आज त्यांचे संगम पुलाजवळील स्मारक पुणे महानगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे अस्वच्छतेच्या विळख्यात अडकले आहे.
इंग्रज सरकारने त्याना ज्या कोठडीत कैद केलेे होते त्या कोठड़ीला तर आज कुलुप आहे. त्या परिसरात चिखल व कचऱ्याचे साम्राज्य आहे. या कोठड़ीचा दरवाजा तर अक्षरशा अर्ध्यापर्यंत मातीने व्यापलेला आहे. विशेष म्हणजे पुणे पोलिसांच महत्वाच कार्यलय देखील याच परिसरात आहे.या महत्वाच्या ठिकाणाची जर अशी बिकट दुरावस्था असेल तर यासारखी दूसरी शरमेची ती बाब कोणती..? आता या सर्व प्रकरणाकडे पालिका प्रशासन कश्या पद्धतीने पाऊल उचलतय हे पाहन महत्वाच आहे.