झोपा काढणाऱ्या महापालिकेला घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ ची आठवण

औरंगाबाद कचरा प्रश्न

औरंगाबाद: औरंगाबादची कचराकोंडी गेल्या २६ दिवसापासून सुटत नसून शहरात ठिकठिकाणी कचरा दिसत आहे. आता पर्यंत झोपा काढणाऱ्या महापालिकेला शेवटी घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ ची आठवण आली आहे.

या अधिनियमानुसार दररोज शभंर किलोपेक्षा जास्त कचरानिर्मिती करणाऱ्यांना  नोटिसा पाठवण्यात येत आहेत. यामध्ये शासकीय वैद्कीय महाविद्यालय, कँन्सर हॉस्पिटलचा समावेश आहे.  निघणाऱ्या कचऱ्याची तुम्हीच विल्हेवाट लावा अश्या नोटीस मनपाकडून  पाठवण्यात येत आहेत. घाटी कँन्सर हॉस्पिटल मध्ये दररोज दोन टन कचरा निघतो. महापालिकेतर्फे मेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्यात येते असली तरी इतर कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी असे या नोटिसांमध्ये सांगण्यात आले आहे.