उदगीर मध्ये गीता बबिताची आठवण, गुडसुर मध्ये रंगली ‘दंगल’

लातूर /(प्रतिनिधी ) ज्ञानेश्वर राजुरे : उदगीर तालुक्यातील गुडसुर येथे दोन दिवसापूर्वी श्री विठ्ठल- रुक्मिणी यात्रे निमित्त कुस्तीचा फड रंगला दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या गावात यात्रे निमित्त कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या, या वर्षी महिलांसाठी स्वतंत्र कुस्ती ठेवण्यात अली, आणि खऱ्या अर्थाने दर्शकांना दंगल चित्रपटाची अनुभूती आली. आणि एक लढत पुरुष आणि महिला गटात झाली आणि यात जळकोटच्या जैमिम मुक्रम बागवान हिने नांदेडच्या पुरुष मल्ला चा परावभाव केला .

तब्बल सहा मिनिटे चाललेल्या या कुस्तीत जैमिम ने सुरवाती पासूनच प्रतिस्पर्धी वर पकड साधली होती शेवटी सहाव्या मिनिटाला ढाक या डावावर जैमिम ने पुरुष मल्ला ला चितपट करून अस्मान दाखवले , कोणताही आखाडा नसताना काळ्या मातीत रंगलेल्या या कुस्तीच सर्वत्र कौतुक होत आहे. काळी माती असल्याने कुस्तीपटूची जायबंदी होण्याची शक्यता असली तरी कोणतीही तमा न बाळगता मल्लानी दाखवलेल्या या कौशल्याच कौतुक करावं तेवढं कमी आहे. या तुल्यबळ लढतीत महिला कुस्तीपटूने मिळवलेला विजय जिल्हाभर चर्चेचा विषय बनलाय. कोणतीही सोयी सुविधा नसताना ग्रामीन भागात जैमिमने मिळवलेल्या या विजयाचे कौतुक सर्वत्र होत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर हा विषय धुमाकूळ घालताना दिसतोय.

पहा ही संपूर्ण कुस्ती