‘रेमडेसिवीर बारामतीत मिळते पण जामखेडला नाही’, माजी मंत्री राम शिंदेंची पवारांवर टीका

अहमदनगर : कोरोना आजारावर उपयोगी ठरणारे रेमडेसीवीर इंजेक्शन बारामतीमध्ये मिळते पण जामखेडला मिळत नाहीत. जिल्ह्यात कुठेही ऑक्सिजनचा तुटवडा नाही फक्त जामखेडमध्ये तुटवडा आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे तीन वेळा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला होता यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला हे शासन व प्रशासनाच्या समन्वयाअभावी घडले आहे. तसेच सध्या गावागावात वाडी वस्तीवर अनेक मृत्यू होत आहेत पण प्रशासनाकडून आकडे लपवले जात आहेत, असा आरोप माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.

माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी जामखेड शहरातील नऊ खाजगी कोविड सेंटरला भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता टिका केली. खासगी कोविड सेंटरला भेट दिल्यावर येथील डॉक्टरांच्या मते बेड शिल्लक आहेत पण प्रशासनाकडून ऑक्सिजन पुरवठा होत नाही.

येथील अधिकारी हे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहेत. त्यामुळे उपचार करण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. नागरिक व लोकप्रतिनिधी यांनी एकत्रितपणे समन्वयाने काम करण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्र येऊन समन्वयाने काम करत कोरोनाला लवकरात लवकर पळवून लावू असे शिंदे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या :

IMP