fbpx

Relince jio- ‘जिओ’ची 5 जी सेवा सुरु होणार !

रिलायन्स जिओ आता लवकरच 5 जी इंटरनेट सेवा क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. बार्सिलोनामधील वर्ल्ड मोबाईल काँग्रेसमध्ये रिलायन्स जिओने सॅमसंगसोबत नव्या प्रकल्पाची घोषणा केली. त्यामुळे 2018 पर्यंत रिलायन्स जिओ आणि सॅमसंगकडून 5 जी सेवेचा शुभारंभ केला जाऊ शकतो.
नव्या प्रकल्पाच्या मदतीने देशभरातील 90 टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट रिलायन्स जिओने ठेवले आहे. देशाच्या ग्रामीण भागापर्यंत इंटरनेट सेवा पुरवण्याचा आणि देशात 4 जी सेवेसोबतच 5 जी सेवा आणून डिजीटल इंडियाला प्रोत्साहन देण्याचा मानस रिलायन्स जिओ आणि सॅमसंगने व्यक्त केला आहे.