मुंबई : शिवसेनाप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ८४ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी श्रीधर पाटणकर यांच्याविरोधात सबळ पुरावे नसल्याचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयने कोर्टात सादर केला. हा रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला असल्याने पाटणकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या प्रकरणी तपास सुरूच राहणार आहे.
श्रीधर पाटणकर व्यवसायानं बिल्डर आहेत. मुंबई आणि ठाण्यात प्रामुख्यानं त्यांचे प्रकल्प आहेत. व्यावसायिक श्रीधर पाटणकर यांच्यावर मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने कारवाई करत त्यांची मालमत्ता जप्त केली होती.
या प्रकरणी ईडीनं (ED) युनियन बँकेचे अधिकारी, काही ज्वेलर्स आणि पुष्पक बुलियन कंपनीचे संचालक यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याचा तपास सुरू झाला. ईडीनं कारवाई दरम्यान श्रीधर पाटणकर यांची साडेसहा कोटींची मालमत्ता जप्त केली. पण, आता पाटणकर यांना या प्रकरणी सीबीआयकडून दिलासा मिळालाय. पाटणकर गेल्या काही महिन्यापासून सीबीआय, ईडीच्या रडार होते.
चंद्रकांत पटेल आणि महेश पटेल यांनी संगनमतानं ‘पुष्पक रिएलिटी‘ या पुष्पक ग्रुपमधील कंपनीत तब्बल २० कोटी रुपये गुंतवल्याचा आरोप आहे. ही रक्कम नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यामार्फत वेगवेगळ्या बोगस कंपन्यांमध्ये गुंतवले असल्याचा आरोप आहे. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मालकीच्या हमसफर डीलर प्रा. लि. या केवळ कागदोपत्री असलेल्या कंपनीमार्फत श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती या कंपनीला ३० कोटी रुपये बिगर तारण कर्ज दिल्याचं दाखवलं, असा आरोप आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<