Share

Rashmi Shukla । रश्मी शुक्ला यांना दिलासा! अवैध फोन टॅपिंग प्रकरणात राज्यसरकारचा मोठा निर्णय

Rashmi Shukla। मुंबई : अवैध फोन टॅपिंग प्रकरणात (Phone Tapping Case) पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला मागील दोन वर्षे चर्चेत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे फोन टॅप केल्याचे त्यांच्यावर आरोप होते. याप्रकरणी राज्य सरकारकडून त्यांना दिलासा मिळाला आहे. रश्मी शुक्ला  (Rashmi Shukla) यांच्या विरोधात खटला चालविण्यास राज्य सरकारने नकार दिला असून खटला चालवण्यासाठी मागितलेली परवानगी गृह खात्याने नाकारलेली आहे.

रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदेशीर फोन टॅपिंगचे गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नियमानुसार कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याच्या विरोधात खटला चालविण्यासाठी केंद्रीय किंवा राज्याच्या गृहखात्याची परवानगी बंधनकारक असते. आता या प्रकरणाला गृह विभागाने लाल दिवा दाखवला आहे. त्यामुळे पोलीस हा सर्व अहवाल न्यायालात पाठवणार आहेत. त्यानंतर रश्मी शुक्ला यांच्यावरील खटला मागे घेण्यात येणार आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात कायदा विभागाचे तसेच पोलिसांचे मत जाणून घेण्यात आले. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात ज्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, ती कलमं या प्रकरणात लावली जाऊ शकत नाहीत. या संदर्भात झेरॉक्स कागदाव्यतिरिक्त कोणताही पुराव उपलब्ध नाही, असे पोलिसांनी सांगितलेले आहे. त्यामुळे कायदा विभाग आणि पोलिसांचे मत घेऊनच राज्य सरकारने खटला चालवण्यास नकार दिला आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना शुक्ला यांनी तत्कालीन पोलीस महासंचालकांना पाठवलेला गोपनीय अहवाल मार्च २०२१ मध्ये समाजमाध्यमांवर व्हायरला झाला होता. रश्मी शुक्ला यांच्या या अहवालातील तपशील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघड केले होते. तसेच त्याआधारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून पोलिसांच्या नियुक्त्या व बदल्यांमध्ये भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप केला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे  रश्मी शुक्ला यांनी कोणत्याही परवानगीशिवाय फोन टॅपिंग केले असल्याचे मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) पुरावे होते. तरी देखील ही केस बंद झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

Rashmi Shukla। मुंबई : अवैध फोन टॅपिंग प्रकरणात (Phone Tapping Case) पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला मागील दोन वर्षे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now