आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानंतर भारताला दिलासा

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

नवी दिल्ली: कोरोना काळात जगातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थावर विपरीत परिणाम घडून येत आहेत. यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था देखील अपवाद नाही. साध्य देखील देशातील अनेक राज्यांमध्ये तोरणाच्या दुसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी करण्यात आली आहे. यामध्ये सन २०२० मध्ये कोरोना संकटामुळे भारताचा ‘जीडीपी’ उणे ८ टक्क्यांपर्यंत घसरला होता.

दरम्यान आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केलेल्या एका अंदाजाने भारताला दिलासा मिळाला आहे. भारतीय अर्थव्यवस्था कोरोना संकटातून हळूहळू सावरत असून, चीनवर मात करत भारताचा विकास दर (GDP) १२.५ टक्के असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, चालू आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर १०.५ टक्के राहण्याचा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला आहे.

साध्य देशात उद्योगधंदे हळूहळू सावरत असून, जीडीपी वेगवान होऊन भारत २०२१ मध्ये चीनच्या तुलनेत सरस कामगिरी करेल. भारताचा विकासदर विक्रमी १२.५ टक्के इतका असेल, भारतीय अर्थव्यवस्थेच्या आढाव्यानुसार जीडीपीबाबत नाणेनिधीने १ टक्का वाढ केल्याचे नाणेनिधीच्या अर्थतज्ज्ञ गिता गोपीनाथ यांनी म्हटले आहे. तर, सन २०२२ पर्यंत जागतिक अर्थव्यवस्था ६.९ टक्क्यांनी वृद्धिंगत होईल, असेही नाणेनिधीने आपल्या अहवालात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :