रिलायन्सचा नवा प्लॅन, 33 रुपयात 1 GB डेटा

मुंबई : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनने 33 रुपयांच्या प्लॅनची घोषणा केली आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेटा आणि व्हॉईस कॉलिंग दोन्हीही मिळणार आहे. या प्लॅनची किंमत वेगवेगळ्या सर्कलमध्ये वेगवेगळी असण्याची शक्यता वर्तविली आहे. दोन दिवसांसाठी असलेल्या या प्लॅनमध्ये 1GB डेटासोबत कोणत्याही नेटवर्कवर एका तासासाठी व्हॉईस कॉलिंग करता येणार आहे.

मात्र यासाठी 2G ग्राहकांना 4G मध्ये अपग्रेड करावे लागणार आहे. अन्यथा ग्राहकांना सेवेचा लाभ मिळणार नाही. कंपनीचा हा प्लॅन आरकॉमच्या सर्व सर्कलसाठी उपलब्ध आहे. केवळ 3G ग्राहकांसाठीच हा प्लॅन उपलब्ध असेल. 193 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच हा प्लॅन आहे. मात्र यामध्ये दररोज 1GB डेटासोबत व्हॉईस कॉलिंगसाठी 30 मिनिटंही मिळणार आहेत.