WhatsApp नंतर रिलायन्स जिओचं नेटवर्क देखील डाऊन; #jiodown ट्रेंड व्हायरल

मुंबई : फेसबूक, इन्स्टा आणि व्हाट्सअप अ‍ॅपप्लिकेशन ४ ऑक्टोंबर २०२१ रोजी ९:१५ वाजेच्या सुमारास संध्यकाळी बंद पडले होते. त्यानंतर तब्बल ७ तासानंतर हे अ‍ॅप्स परत सुरु करण्यात आले आहे. अचानक बंद पडलेल्या या अ‍ॅप्समुळे अनेकांची धांदल उडाली. त्यानंतर आता आज सकाळी ही वेळासाठी रिलायन्स जिओचं नेटवर्कही डाऊन झाले होते. फेसबूक, इन्स्टा आणि व्हाट्सअप बंदनंतर आता जिओचं नेटवर्क देखील नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याबबत सध्या ट्विटरवर बरेच मिम्स व्हायरल होत आहे.

मध्यप्रदेश, छत्तीसगढ, मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि आणखी काही शहरांमधील ग्राहकांना एक ते दीड तासांसाठी नेटवर्कच्या समस्या  जाणवत होत्या. त्यामुळे  ट्विटरवर #jiodown ट्रेंड सध्या पाहायला मिळत आहे. जिओ वापरकर्त्यांची संख्या देखील अधिक असल्याने अनेकांना काही काळ या समस्येचा सामना करावा लागला.

दरम्यान, फेसबुक आणि इन्स्टाग्राम सहा तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी बंद राहिल्यामुळे मार्क झुकरबर्गने फेसबुक पोस्ट शेअर करत युजर्सची माफी मागितली. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास ही सेवा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, Facebook, Instagram, आणि WhatsApp सर्वर डाऊन का झाला हे अजून स्पष्ट झालं नाही. मात्र यासाठी मार्क झुकरबर्गने फेसबुक पोस्ट शेअर करत युजर्सची माफी मागितली होती.

महत्वाच्या बातम्या: