Reliance Jio- जिओच्या युजर्सची माहिती उघड झाल्याने खळबळ

रिलायन्स जिओच्या सर्व युजर्सची माहिती एका संकेतस्थळावरून उघड करण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून याबाबत जिओने मात्र सावध पवित्रा घेत चौकशी करण्याचे जाहीर केले आहे.

जगातील बर्‍याच राष्ट्रांमध्ये युजर्सचा डाटाबेट हा खुल्या पध्दतीने उपलब्ध करण्याचे प्रकार होत असतात. यावरून माहितीच्या सुरक्षेच्या मुद्याबाबत चिंतादेखील व्यक्त करण्यात येते. भारतात या पध्दतीने रिलायन्स जिओ सेवेच्या दहा कोटींपेक्षा जास्त युजर्सची माहिती एका संकेतस्थळावर टाकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ‘मॅजिकपीके’ (“magicapk.com”) या संकेतस्थळावर जिओच्या युजर्सची माहिती टाकण्यात आली असून यात युजर्सचे नाव, क्रमांक, लिंग, पत्ता आदींचा समावेश आहे. लक्षणीय बाब म्हणजे जिओची नोंदणी करतांना संबंधीत युजरकडून त्याचे आधारकार्डही घेण्यात आलेले आहे. यामुळे हॅकर्सनी आधारची माहितीदेखील लीक केली की काय? अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, काही तासानंतर ‘मॅजिकपीके.कॉम’ या संकेतस्थळाचे अकाऊंट सस्पेंड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र त्याआधी या वेबसाईटवर कुणीही क्रमांक टाकून कोणत्याही युजरची गोपनीय माहिती मिळवू शकत असल्याचे असंख्य स्क्रीनशॉट सोशली मीडियात शेअर करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे जिओतर्फे या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

You might also like
Comments
Loading...