Jio- रिलायन्स जिओची नवी ऑफर

रिलायन्स जिओने आपल्या यूजर्ससाठी एक नवी ऑफर आणली असून ही ऑफर जिओफाय ग्राहकांना मिळणार आहे. यासाठी ग्राहकांना जिओच्या वेबसाइटवरुन 1999 रुपयाचे  जिओफाय वाय-फाय राउटर खरेदी करावे  लागणार आहे. तसेच यासोबत एक सिमही विकत घ्यावं लागणार आहे. यावर 99 रुपये रिचार्ज करावं लागेल.
जिओ-फायवर 4 प्लान
 
1) 149 रुपये : यामध्ये तुम्हाला दर महिन्याला 2 जीबी डेटा मिळणार आहे. यासाठी 99 रुपयांसोबत 149 रुपयाचं रिचार्ज केल्यानंतर वर्षभरासाठी 24 जीबी डेटा मिळेल.
2) 309 रुपये – यामध्ये 6 महिन्यापर्यंत दररोज 1 जीबी डेटा मिळणार आहे. ही ऑफर तुम्हाला 6 रिचार्जवर मिळेल. म्हणजे या ऑफरमध्ये तुम्हाला 168 जीबी डेटा मिळणार आहे. यासाठी 99 रुपयांसोबत 309 रुपये रिचार्ज करावं लागणार आहे.
3) 509 रुपये – यामध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे. 28 दिवसाच्या सायकलप्रमाणे 4 रिचार्ज सायकलवर 224 जीबी डेटा मिळणार आहे.
4) 999 रुपये – यामध्ये 56 दिवसांसाठी 120 जीबी डेटा मिळणार आहे.