रिलायन्स जिओचा अँण्ड्रॉईड स्मार्टफोन येणार

मुंबई : रिलायन्स कंपनी अँण्ड्रॉईड या प्रणालीवर आधारित स्मार्टफोन आणणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रिलायन्स जिओ गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून सेवेत दाखल झाला होता. प्रारंभी मोफत आणि नंतर अल्प मूल्यात फोर-जी व्हिओएलटीई सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे अन्य कंपन्यांनाही नाईलाजाने किफायतशीर प्लॅन जाहीर करावे लागते. अर्थात कंपन्या जिओच्या प्राईस वॉरशी टक्कर घेण्यासाठी तयार होत असतांनाच जिओफोनची घोषणा करण्यात आली. अवघ्या १५०० रूपयाची डिपॉजिट घेऊन जिओफोन ग्राहकांना सादर करण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर आता याच्या पुढील टप्प्यासाठी नोंदणी सुरू होण्याआधी रिलायन्सने आपल्या रणनितीत बदल केल्याचे दिसून येत आहे. जिओफोनमध्ये सर्व अँण्ड्रॉईड अ‍ॅप्स चालत नसल्यामुळे युजर्सपुढे समस्या निर्माण झाली आहे. यामुळे आता जिओफोनचे उत्पादन थांबविण्यात आले असून स्वस्त अँण्ड्रॉईड फोनच्या उत्पादनाबाबत विचार केला जात आहे.