कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला ‘मोठा’ निर्णय; केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची मदत

मुंबई : संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने गावातील गरीब व रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबाला दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गरजू लोकांसाठी अनेक मदतीचे हात देखील पुढे येत आहे.

तसेच सध्याच्या घडीला कोणताही देश मदतीसाठी पुढे येणार नाही. त्यामुळे आपणच एकत्र मिळून संकटाला मात करणं गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं होतं. याच पार्श्वभूमीवर कोरोनाशी सामना करण्यासाठी रिलायंसने पीएफ रिलीफ फंडला 500 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय रिलायंस कंपनी महाराष्ट्र आणि गुजरात सरकारला प्रत्येकी 5 कोटींची मदत करणार आहे.

‘मला विश्वास आहे की भारत लवकरच कोरोनावर विजय मिळवणार आहे. या कठीण काळात रिलायंस कंपनीची संपूर्ण टीम देशासोबत आहे. कोरोनाला संपवण्यासाठी आपण पूर्णपणे मेहनत घेऊ,’ असं रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले.

दरम्यान, कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने दोन आठवड्यात 100 खाटांचं रुग्णालय तयार केलं आहे. या रुग्णालयात फक्त कोरोनावर उपचार केले जाणार आहे.
reliance-industries-limited-announces-contribution-to-pmcares-fund-mukesh-ambani news update today