चेन्नई : सध्या भारतात आयपीएलचा ‘रण’संग्राम सुरु आहे. ९ एप्रिल पासून आयपीएलच्या १४ व्या हंगामाला सुरुवात झाली. आज राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या दोन संघांमध्ये झुंज पाहायला मिळणार आहे. यावेळी हे दोन्ही संघ विजयाच्या हेतूने मैदानात उतरतील. स्टीवन स्मिथऐवजी संजू सॅमसनकडे राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आता त्याच्या नेतृत्वाकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व लोकेश राहुल करणार आहे.
सामना सुरु होण्याआधीच चाहत्यांना मैदानावर युनिव्हर्स बॉस गेलच्या चौकार-षटकाराची सर्वांना उत्सुकता आहे. मात्र, पंजाब किंग्सच्या पहिल्या सामन्यापूर्वी गेलचं ‘जमैका टू इंडिया’ हे गाणं रिलीज झालं आहे. रॅपर एमिव्हे बंटाय याच्यासोबत गेलनं हे गाणं गायलं आहे आणि हे गाणं सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. त्यात गेल नाचताना दिसत आहे.
हे गाणं इंग्लिशमध्ये गेलनं, तर हिंदीत एमिव्हेनं गायलं आहे. याला संगीत टोनी जेम्स यानं दिलं आहे. एमिव्हेनं हे गाणं यूट्यूब चॅनेलवर रिलीज केलं आणि आतापर्यंत १२ लाखांहून अधिक लोकांनी ते पाहिलं आहे. ख्रिसच्या गाण्याला भारतीय चाहत्यांनी बरीच पसंती दर्शवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- प्रवीण अमरेंमुळे उत्तम कामगिरी करू शकलो : पृथ्वी शॉ
- डेव्हीड वॉर्नरच्या ‘या’ चुकामुळे झाला हैदराबादचा पराभव
- कोरोनावर मात केलेल्या राणाचे नाणे खणखणीत वाजले; 80 धावांची खेळी करुन उचलला विजयात मोलाचा वाटा
- आजचा सामना राजस्थानविरुद्ध पंजाब
- अर्धशतकानंतर बोटातली रिंग दाखवत नितीशने केले सेलिब्रेशन ; खास व्यक्तीला समर्पित केली ही खेळी