मेहबुबा मुफ्ती यांची सुटका करा : राहुल गांधी

mehbooba mufti and rahul gandhi

नवी दिल्ली- खासदार राहुल गांधी यांनी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना अद्यापही ताब्यात ठेवण्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली असून लोकशाहीला तडा गेला असल्याचं म्हटलं आहे.या सोबतच मेहबुबा मुफ्ती यांची सुटका करण्याची मागणी केली.

‘ज्या दिवशी नेत्यांना अटक करण्यात आली त्या दिवशी भारताच्या लोकशाहीला धक्का बसला’, असे राहुल गांधी म्हणाले. जम्मू-कश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला 1 वर्ष पूर्ण होत असून त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे ट्विट केले आहे.

गेल्या वर्षी 5 ऑगस्टला जम्मू-कश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. या निर्णयानंतर कश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून हुर्रीयत नेते, माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी ओमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला यांची सुटका करण्यात आली. मात्र मेहबुबा मुफ्ती यांना आणखी 3 महिने बंधनात ठेवण्याचा निर्णय गेल्या शुक्रवारी झाला.यावरूनच राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधला.

‘भारतातील लोकशाही त्याच दिवशी डळमळीत झाली ज्या दिवशी केंद्र सरकारने अवैधरित्या नेत्यांना अटक केली. आता मेहबुबा मुफ्ती यांची सुटका करण्यात यावी’, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी घोषणा केलेल्या १ कोटी मधला एकही रुपया अजून आला नाही!

चार-पाच लफडी ठेवणं शिवसेना आमदार खासदारांचा धंदा; निलेश राणेंचा घणाघात

IMP