“सडक २” या हिंदी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर! ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

मुंबई: कोरोना रोगाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. लॉकडाऊननंतर आता अनलॉक अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असलं तरी, चित्रपटगृहे कधी चालू होणार याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. वाढती रुग्णसंख्या व कोरोनाचा धोका बघता, सद्या चित्रपटगृह सुरु करणे देखील शक्य नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे, आता पर्याय म्हणून ऑनलाइन OTT प्लॅटफॉर्मवरच चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरुवात झाली आहे.

“सडक २” या आलिया भट्टच्या चित्रपटाची तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघत होते. तर, नव्या पोस्टरद्वारे चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आली आहे. सोबतच, या पोस्टरमध्ये संजय दत्त, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर देखील दिसत आहेत. आलिया भट्टने ट्‌विट करत पोस्ट केले की, ‘सडक 2′, प्यार की राह, 28 ऑगस्ट रोजी डिजनी प्लस हॉटस्टार व्हीआयपीवर स्ट्रिमिंग होईल. काही दिवसांपूर्वी आलियाने ‘सडक 2′ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली होती आणि आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही आली आहे.

‘या’ निर्णयाबद्दल राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दणका!

1991च्या ‘सडक’ या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. यात पूजा भट्ट आणि संजय दत्तची जोडी दिसली होती, तर ‘सडक 2’मध्ये ही जोडीही एका खास भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. दरम्यान, महेश भट्ट यांनी 21 वर्षांनंतर ‘सडक 2’मधून पुन्हा दिग्दर्शकाची जबाबदारी पार पडली आहे. त्याचबरोबर चित्रपटाची कथाही त्यांनीच लिहिली आहे. यापूर्वी त्यांनी 1999 साली ‘कारतूस’ हा शेवटचा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

विजयदुर्ग किल्ल्याची पडझड; खासदार संभाजीराजेंनी पुन्हा गाठली दिल्ली