डॉ. स्वाती पाटील आत्महत्या प्रकरणातील जामीन अर्ज फेटाळला

sexual harassment by teacher in paithan

जळगाव : कठोरा येथील डॉ. स्वाती अभिजीत पाटील या विवाहितेने सासरच्या मंडळींच्या शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. २५ जुलैला घडली होती. यातील तिघेही संशयित कारागृहात असून त्यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने तिघांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. आत्महत्यापूर्वी स्वाती पाटील यांनी लिहिलेली 11 पानी सुनासाईड नोट तालुका पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी सुनील नारायण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित अभिजीत गोपाळ पाटील, गोपाळ इसन पाटील, मिराबाई गोपाळ पाटील या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या तिघेही संशयित हे कारागृहात असून, त्यांनी जामीन मिळावा यासाठी न्या. सविता बारणे यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर बुधवारी कामकाज होऊन न्या. बारणे यांनी तिघांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. पंढरीनाथ चौधरी यांनी तर मुळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. गोपाळ जळमकर यांनी कामकाज पाहिले.