पीपल्स युनियनची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी

पुणे: पुणेकरांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या पीपल्स युनियन संघटनेची भारतीय निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष रमेश धर्मावत यांनी दिली आहे. पीपल्स युनियन नेहमीच पुणेकरांसाठी काम करत आलेली आहे, येत्या काळात सरकारी नागरी सोयी- सुविधांचे खासगीकरण व कंपनीकरण थांबवण्यासाठी राजकीय इछाशक्तीची नितांत आवश्यकता आहे, त्यामुळे नागरिकांना केंद्रस्थानी ठेऊन शाश्वत विकासाकडे नेण्याचे ध्येय ठरवून पीपल्स युनियन पार्टीची स्थापन करण्यात आल्याचं धर्मावत यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, नागरिकांच्या प्रश्नांवर करण्यात येणारी आंदोलने अधिक तीव्र करणार असून या लढ्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन पीपल्स युनियन पार्टीचे अध्यक्ष रमेश धर्मावत यांनी केले आहे.