पुणे शहरात दिवसभरात नवे ५ हजार ६५१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

pune city

पुणे : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने रौद्ररुप धारण केले आहे. देशात दररोज १ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. वाढत्या कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी सरकारडून कडक निबंध देखील लागू केलेले आहेत. देशभरात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील काही दिवसांपासून देशभरात मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

पुणे शहरात आज नव्याने ५ हजार ६५१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ३ लाख ०५ हजार ३७२ इतकी झाली आहे. शहरातील ४ हजार ३६१ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या २ लाख ५३ हजार ७३४ झाली आहे.

पुणे शहरात आज एकाच दिवसात २६ हजार १२० नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता १६ लाख १९ हजार ८५६ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ४६ हजार ०७१ रुग्णांपैकी ९५७ रुग्ण गंभीर तर ४,३२५ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ४१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ५ हजार ५६७ इतकी झाली आहे.

दरम्यान महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने मागणीप्रमाणे लस पुरवठा करावा. २५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे, महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांकडून त्याचा पुरवठा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश द्यावेत, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे आज केली आहे.

महत्वाच्या बातम्या