निलंग्यात आढळलेल्या ८ कोरोनाग्रस्त ‘परप्रांतीयांवर’ रासुका अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा : मनसे

निलंगा : निलंगा शहरातील मस्जिदमध्ये आढळलेले ८ कोरोनाग्रस्त परप्रांतीय निलंगा शहरासह लातूर जिल्ह्यासाठी मृत्यूची घंटा बनले आहेत. पूर्ण जिल्ह्यातून त्यांच्या विषयी जनक्षोभ उसळत आहे. तरी कायद्याची पायमल्ली करुन जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या व कोरोना सारखा भयानक आजार लातूर जिल्ह्यात पसरवणाऱ्या या गुन्हेगारांवर जिल्हाधिका-यांनी तत्काळ रासुका अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी केली आहे.

आजार हा जात – धर्म बघत नाही. परंतु लॉकडाऊन चालू असूनही जर कोणी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या संचारबंदी, जमावबंदी, वाहनबंदी, राज्यबंदी, जिल्हाबंदी या कायद्यांचे एकत्रितपणे एका राज्यात नाही तर ४-५ राज्यात तसेच एका जिल्ह्यात नाही तर डझन दोन डझन जिल्ह्यात बेकायदेशीररीत्या उल्लंघन करणार असेल तर अशा लोकांना देशद्रोही नव्हे तर काय समजायचे? त्यातच प्रशासनाला ड्रायव्हर पळून गेला अशी खोटी माहिती देवून गुमराह करतात याचे कारण काय हेही तपासणे गरजेचे आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

यांच्यामुळे जो पूर्ण मराठवाडा १० जिल्ह्यासाहित(औरंगाबाद मधील एका रुग्णाचा अपवाद)करोनामुक्त होता.या १२ जणांनी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,लातूर या जिल्ह्यातील अनेक गावी मुक्काम करत जनसंपर्क केला.परिणामी आज या सर्व जिल्ह्यातील अनेक गावातील शेकडो लोकांना वेगळे ठेवून कोरोना तपासण्या कराव्या लागत आहेत.पूर्ण मराठवाड्यात कोरोना पॉजिटीव्ही लोक येत आहेत.ही महामारी पूर्ण मराठवाड्यात पसरवणे हे मनुष्यवधाच्या गुन्ह्यापेक्षाही गंभीर आहे.यामुळे देश,महाराष्ट्र, मराठवाडा अडचणीत सापडला असून त्यांच्याकढून मोठा देशद्रोह घडला आहे. रासुका कायद्याखाली ह्या नाराधमांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अन्यथा लातूर जिल्ह्यातील जनतेचा जिल्हाबंदी व लॉक डाऊन यांच्यासाहित शासन व प्रशासन यांच्यावरीलही विश्वास उडेल.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता व प्रत्येक लातूरकर कायद्याचे तंतोतंत पालन करत असतानाही जर बाहेरून कोरोनाग्रस्त लोक येणार असतील तर आमच्या घरात बसण्याला अर्थ काय ? म्हणून जनता उद्रेक करेल यासाठी येणाऱ्या दिवसात कोणी जिल्ह्याबंदीचे उल्लंघन करू नये म्हणून यांच्यावर कठोर कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे डॉ. भिकाणे म्हणाले.

माॕर्निंगवॉक वाल्यांवर गुन्हे आणि हरियाणा टू निलंगा वॉक वाल्यांचे मात्र स्वागत !

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे माॕर्निंग वॉक वाल्यांना कोरोना पसरवू नये म्हणून फेसबुक लाईव्ह करुन लातूरमधील १२० जणांच्या विरोधात गुन्हे नोंदवून कडक शासन करतात अन् अनेक कायद्यांचे उल्लंघन करुन कोरोनासहित आलेल्या परप्रांतीय गुन्हेगारांवर संचारबंदी, राज्यबंदी, जिल्हाबंदी, जमावबंदी असतानाही त्यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई होत नाही! जिल्हाबंदी असतानाही आलेल्या लोकांचे स्वागत करायचे तर मग जिल्हाबंदी कशासाठी ?असा सवाल डाॕ.भिकाणे यांनी उपस्थित केला. जिल्हाधिकाऱ्यांनी असा पक्षपातीपणा न करता दोषींवर रासुका अंतर्गत गुन्हे दाखल करत कडक कारवाई करावी. जिल्हाबंदी कडकपणे राबवून या प्रकरणातील संबंधित दोषी अधिकाऱ्यांचीही सखोल चौकशी करावी अन्यथा मनसेला लॉकडाऊनला ‘लॉक’ लावून लातूरकरांसाहित रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. भिकाणे यांनी जिल्हाप्रशासनास दिला आहे.