fbpx

प्रादेशिक पक्ष ठरणार दिल्लीत किंगमेकर, पवार, रेड्डी, राव, ममतांची निर्णायक भूमिका

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीसाठी सहाव्या टप्यातील मतदान आज पार पडत आहे, सात राज्यांमधील ५१  मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे. यंदाची लोकसभा निवडणूक हि सात टप्यामध्ये होत असल्याने आता केवळ शेवटचा टप्पा उरलेला आहे. दरम्यान, आता दिल्लीच्या तख्तावर नेमक कोण बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे विरोधकांच्या नौका डगमगल्या, त्यामुळे देशातील प्रमुख पक्ष कॉंग्रेसला देखील केवळ ४४ जागांवर समाधान मानावे लागले होते. केद्रीय पक्षाच्या पडझडीत देखील काही प्रादेशिक पक्षांनी आपले स्थान भक्कम ठेवले. भाजपला एकहाती बहुमत मिळाल्याने मात्र आघाडी – युतीच्या राजकारणाला जास्त वाव राहिला नाही.

मागील पाच वर्षात देशातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात भाजपला काही प्रमाणात यश आले आहे. मात्र नोटबंदी, जीएसटी, बेरोजगारी, शेतकरी प्रश्नांवर सरकार अपयशी ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या एकाधिकारशाहीमुळे भाजपचे अनेक मित्रपक्ष नाराज झाले. निवडणुकीच्या तोंडावर मात्र शिवसेना, अकाली दल, आरजेडी, जदयु सारखे मित्रपक्ष भाजपसोबत पुन्हा एकत्र आले, मात्र निवडणुकीनंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीमध्ये हेच मित्रपक्ष भाजपला तारणार का हे पाहणे देखील महत्वाचे आहे.

आताच्या परिस्थितीमध्ये भाजपला जास्त जागा मिळण्याची शक्यता असली, तरी सत्ता स्थापनेसाठी त्यांना इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे दिल्लीच्या सत्तेमध्ये प्रादेशिक पक्ष किंगमेकरची भूमिका निभावू शकतात.

पश्चिम बंगलामध्ये ममता बॅनर्जीचा तृणमूल कॉंग्रेस, तेलंगानामध्ये टीआरएस, आंध्रप्रदेशमध्ये वायएसआर कॉंग्रेस, ओडीसामध्ये बिजू जनता दलाला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. या सर्व पक्षांनी अजूनही कोणासोबत जाणार हे स्पष्ट केलेलं नाही. दुसरीकडे महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.

२०१४ साली पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागांपैकी ३४ जागा तृणमूल कॉंग्रेसने जिंकल्या, तर ओडिशामध्ये २१ पैकी २० बिजू जनता दलाने, आंध्र प्रदेशात २५ पैकी ९ जागा वायएसआर काँग्रेसने, तेलंगणात १७ पैकी ११ जागा टीआरएसने जिंकली होत्या. म्हणजेच चार राज्यामध्ये एकूण १०५ पैकी ७४ जागांवर या चार पक्षांनी विजय मिळवला होता. यंदाही एवढ्याच किंबहुना अधिक जागा मिळवत तेच किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.

२०१४ चे पक्षीय बलाबल

भारतीय जनता पक्ष – २८२
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ४४
ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळ्हम् – ३७
तृणमूल काँग्रेस – ३४
बीजू जनता दल – २०
शिवसेना – १८
तेलुगू देसम पक्ष – १६
तेलंगण राष्ट्र समिती – ११
माकप – ९
वाईएसआर कांग्रेस – ९
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – ५
इंडियन युनियन मुस्लिम लीग – २
जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी – ३
शिरोमणी अकाली दल – ४
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया – १
संयुक्त जनता दल – २
इंडियन नॅशनल लोक दल – २
लोक जनशक्ती पक्ष – ६
राष्ट्रीय जनता दल – ४
क्रांतिकारी समाजवादी पक्ष – १
जनता दल (धर्मनिरपेक्ष) – २
राष्ट्रीय लोक समता पक्ष – ३
स्वाभिमानी पक्ष – १
आम आदमी पार्टी – ४
केरळ काँग्रेस – १
अपना दल – २
ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट – ३
समाजवादी पक्ष – ५
अपक्ष – २
एकूण – ५४३