टीम महाराष्ट्र देशा: सरकारी परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांना नोकरी संधी (Job Opportunity) उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय विद्यालय (Kendriya Vidyalaya KVS) मध्ये बंपर भरती प्रतिक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेमध्ये केंद्र विद्यालयात 13 हजाराहून अधिक पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक शिक्षण, टीजीटी, पीजीटी आणि इतर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्रधारक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तरी, पदानुसार पात्रधाराक उमेदवार या पदांच्या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी kvsangathan.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
विविध पदांच्या 13000 हून अधिक जागा
केंद्रीय विद्यालय यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी 13 हजाराहून अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये प्राथमिक शिक्षक-६४१४ पदे, PGT-1409 पदे, TGT-3176 पदे, सहाय्यक आयुक्त-52 पदे, प्राचार्य-239 पदे, उपप्राचार्य-203 पदे, ग्रंथपाल-355 पदे, प्राथमिक शिक्षक (संगीत)-303 पदे, वित्त अधिकारी-6 पदे, सहाय्यक अभियंता-2 पदे, सहाय्यक विभाग अधिकारी-156 पदे, हिंदी अनुवादक-11 पदे, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक-322 पदे, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक-702 पदे, स्टेनोग्राफर ग्रेड II-54 पदे इत्यादी पदांचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रता
केंद्रीय महाविद्यालयाच्या या भरती प्रक्रियेसाठी मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारापासून ते मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर या पदांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल आणि वयोमर्यादेबद्दल माहिती मिळवण्यासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवार kvsangathan.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी केंद्रीय विद्यालय बंपर भरती प्रक्रिया राबवत आहे. या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार पात्रधारक उमेदवार 5 डिसेंबर 2022 पासून ते 26 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
महत्वाच्या बातम्या
- Amol Mitkari | भाजपवाल्यांनी शिवरायांच्या अपमानाची सुपारी घेतली ; अमोल मिटकरी यांचा आरोप
- Sanjay Gaikwad | “संजय राऊत फाटक्या तोंडाचे”; संजय गायकवाड यांची सडकून टीका
- Muscle Pain | हिवाळ्यात सांधे दुखीच्या समस्येपासून त्रस्त आहात?, तर करा ‘हे’ उपाय
- IND vs BAN | शानदार खेळीनंतर मेहिदी हसन मिराजने केला ‘हा’ मोठा खुलासा, म्हणाला…
- Gold Mines | राज्यात ‘या’ ठिकाणी आहेत सोन्याच्या खाणी?, जीएसआयने दिली माहिती