Share

IBPS Recruitment | IBPS यांच्यामार्फत विविध विशेष अधिकारी पदांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

टीम महाराष्ट्र देशा: बँक परीक्षा Bank Exam ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) मोठी संधी उपलब्ध करून देत आहे. देशात एकीकडे बेरोजगारी बद्दल बोलले जात असताना IBPS यांच्यामार्फत विविध विशेष पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) यांच्यामार्फत विविध पदांच्या तब्बल 710 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांसाठी पदांनुसार पत्रधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. पदानुसार इच्छुक उमेदवारांनी या पदांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी ibps.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

IBPS यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण 710 जागा

बँकेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कर्मिक सिलेक्शन यांच्यामार्फत विविध पदांसाठी बंपर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल विविध विशेष पदांच्या 710 जागा आहे. त्यामध्ये आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, कार्मिक अधिकारी (एचआर) आणि विपणन अधिकारी पदाच्या जागा इत्यादी पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता

nmk.co.in या अधिकृत वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कर्मिक सिलेक्शन यांच्यामार्फत राबविण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार किमान मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातून पदवीधारक असावा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

IBPS यांच्यामार्फत राबविण्यात आलेल्या या विशेष अधिकारी पदांसाठी पदानुसार पात्रधारक उमेदवार 21 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. तरी पदानुसार इच्छुक उमेदवारांनी ibps.in या पदांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: बँक परीक्षा Bank Exam ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) मोठी संधी उपलब्ध …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now