महावितरणमध्ये ४०१ पदवीधर, पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी पदाची भरती

mahavitaran

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण)च्यावतीने पदवीधर व पदविका प्रशिक्षणार्थी अभियंता या पदांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात आली असून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया नियमानुसार व पारदर्शक पध्दतीने करण्यात येत आहे.

पदविधर प्रशिक्षणार्थी अभियंता पदासाठी एकूण ६३ जागा तसेच पदविका प्रशिक्षणार्थी अभियंत्यांच्या एकूण ३३८ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महावितरणचे संकेतस्थळ www.mahadiscom.in यावर भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती उपलबध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन प्रवेशअर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवार दि. २८ ऑगस्ट २०१८ पासून सुरू झाली असून प्रवेश अर्ज भरण्याचा अंतीम दिनांक १७ सप्टेंबर २०१८ आहे. ऑनलाईन परीक्षा ऑक्टोबर २०१८ मध्ये होणार असून परिक्षेच्या १० दिवसांपूर्वी उमेदवारांनी ऑनलाईन परिक्षेचे कॉललेटर डाऊनलोड करता येणार आहे.

या भरतीप्रक्रियेत रिक्त पदांसाठी जाहिरात देताना यापूर्वी अशा पदांची सरळसेवेने करण्यात आलेली भरती, कार्यरत कर्मचारी तसेच सध्यस्थितीतील अनुशेष विचारात घेऊन जाहिरात देण्यात आलेली आहे. पदवीधर प्रशिक्षणार्थी अभियंत्यांच्या रिक्त पदांमध्ये अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जमाती आणि खुल्या प्रवर्गातील पदांचा अनुशेष उपलब्ध नसल्याने जाहिरातीमध्ये दर्शविण्यात आलेला नाही, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.