बँकेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ऑक्टोबर महिना घेऊन आला आहे खुशखबर! कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक बँकांमध्ये होणार आहे बंपर भरती. यामध्ये SBI, सेंट्रल बँक, UCO बँक आणि नाबार्ड बँक यांचा समावेश आहे. या बँकेमध्ये पदानुसार पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहे. तरी सर्व पात्रधारक उमेदवारांनी या बँकांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती तपासावी.
कोणत्या बँकांमध्ये होणार आहे बंपर भरती ?
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांच्या एकूण 1673 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी SBI च्या sbi.co.in या वेबसाईटला भेट द्यावी. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India)
सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 110 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये आयटी, अर्थशास्त्रज्ञ, डेटा सायंटिस्ट, जोखीम व्यवस्थापक, आयटी विश्लेषक (SOC), आयटी सुरक्षा विश्लेषक, तांत्रिक अधिकारी (क्रेडिट), क्रेडिट अधिकारी, डेटा अभियंता, कायदा अधिकारी, सुरक्षा आणि आर्थिक विश्लेषक पदांचा समावेश आहे. या पदांसाठी 17 ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल. पात्रधारक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी Centralbankofindia.co.in ही अधिकृत वेबसाईट तपासावी.
नाबार्ड (NABARD)
नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट (NABARD) मध्ये विकास सहाय्यक पदांसाठी पात्रधारक उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांच्या भरती बद्दल अधिक माहितीसाठी उमेदवार nabard.org या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
युको बँक (UCO Bank)
ऑक्टोबर महिन्यात युको बँक मध्ये सुद्धा बंपर भरती सुरू आहे. युको बँक मध्ये सुरक्षा अधिकारी पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. हे अर्ज भरण्याची अंतिम तारीख 19 ऑक्टोबर 2022 आहे. या अर्जाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ucobank.com या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
महत्वाच्या बातम्या
- Nilam Gorhe | नार्वेकरांच्या ‘त्या’ चर्चांबदल निलम गोऱ्हेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या…
- Ajit Pawar | “आम्ही सत्तेत येऊन बसेल अन् तुम्हाला…”, अजित पवारांचा इशारा
- Rahul Gandhi । राहुल गांधींचा पवार पॅटर्न, कर्नाटकात भर पावसात सभा गाजवली, भारत जोडो यात्रेतील Video
- Raosaheb Danave | ‘भाजपशी युती नको’, म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांवर दानवेंचा हल्ला
- IND | पहिले देश नंतर मी, विराटच्या निस्वार्थपणाचा पाहा VIDEO