महाविकासआघाडीचे सरकार येताचं निघाली पोलीस भरती

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताचं पोलीस भारती काढण्यात आली आहे. पोलीस शिपाई चालक पदांसाठी 1019 जागा भरण्यात येणार आहेत. ही भरती होत असली तरी अतिशय किरकोळ भरती असल्याचं पोलीस भरतीस इच्छुक असणाऱ्या मुलांकडून सांगण्यात येत आहे.

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने महाविकास आघाडी स्थापन करुन सरकार स्थापन केलं आहे. मात्र अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही, गृहमंत्रीही निश्चित नाही. तरीही, सरकारच्या गृहविभागाकडून 1019 पोलीस पदाची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, पोलीस भरतीकडे डोळे लावून बसलेल्या उमेदवारांना, आर.आर. पाटील यांच्या काळातील भरतीप्रमाणे मोठ्या भरतीची जाहिरात निघावी, अशी अपेक्षा नव्या सरकारकडून आहे.

दरम्यान बृहन्मुंबई – १५६ जागा, ठाणे शहर – ११६ जागा, नागपूर शहर – ८७ जागा, नवी मुंबई – १०३ जागा, अमरावती शहर – १९ जागा, औरंगाबाद शहर – २४ जागा, लोहमार्ग मुंबई – १८ जागा, रायगड – २७ जागा, सिंधुदूर्ग – २० जागा, रत्नागिरी – ४४ जागा, सांगली – ७७ जागा, सोलापूर ग्रा. – ४१ जागा, जालना – २५ जागा, बीड – ३६ जागा, उस्मानाबाद – ३३ जागा, लातूर – ६ जागा, नागपूर ग्रा. – २८ जागा, भंडारा – ३६ जागा,वर्धा – ३७ जागा, अकोला – ३४ जागा, बुलढाणा – ५२ आशा विविध जिल्ह्यात आणि विभागात जागा भरण्यात येणार आहेत. तर यासाठी शैक्षणिक पात्रता ही १२ वी असणारं आहे. तर वयोमर्यादा ही २८ वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत) असणारं आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २२ डिसेंबर २०१९ असणारं आहे.

महत्वाच्या बातम्या

Loading...