रिलायन्स एनर्जीकडून कोटयावधीचा कर वसूल करुन दाखवा – छगन भुजबळ

chagan bhujbal latest pic

नागपूर – राज्यातील अनेक गावांमध्ये वीज नाही…वीज गावागावात पोचवू असे आश्वासन सरकारने दिले…तर दुसरीकडे रिलायन्स एनर्जी कंपनीने दोन हजार कोटी रुपये कर थकवला आहे. दोन वर्षात एक रुपयाही दिला नाही. तरीही त्यांच्यावर कारवाई नाही. तरीही ते कंपनी विकायला निघाले आहेत. शेवटी हे जनतेचे पैसे आहेत. त्यामुळे पाच लाख काय किंवा दहा लाख काय हे सरकार कर्ज होईपर्यंत वाट बघणार आहे का? सर्वसामान्यांकडून वीजबीले वसुल केले जातात परंतु या धनदांडग्याकडून वसूल केले जात नाही. त्यांच्याकडून वसूल करण्याची हिमंत राज्यातील नेत्यांकडे नाही. ती वरुनच केली जावू शकते असा टोला आमदार छगन भुजबळ यांनी लगावला.

पुरवणी मागण्यांवर आमदार छगन भुजबळ आज सभागृहात बोलत होते. आज ते नागपूरच्या पावसाळी अधिवेशनामध्ये दाखल झाले. पुरवणी मागण्यांवर बोलताना आमदार छगन भुजबळ सभागृहामध्ये पुन्हा एकदा आक्रमक रुपात पाहायला मिळाले.

Loading...

नाशिक येथून शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. यामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले होते. त्यांचे पाय रक्ताळे होते. वनहक्काच्या जमिनीसाठी ते आंदोलन होते. न्याय मिळावा अशी त्यांची मागणी होती. तुम्ही त्यांना एक आश्वासन देवून घरी पाठवले पण त्यावर काही केले नाही असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला.

या सरकारने लोकांना फसवले, यांनी काय दिवे लावले ? एक लाख कोटी रुपयांच्या मागण्या आपण केल्या आहेत. सरकारने राज्याची आर्थिक स्थिती बिघडवली आहे असाही आरोप भुजबळ यांनी यावेळी केला. सरकारने राज्याला खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले, टोलमुक्त करण्याचे आश्वासन दिले त्याचे काय झाले ? असा सवालही सरकारला छगन भुजबळ यांनी केला.

नागपुरात आज धडाडणार भुजबळांची तोफ

पंकज! ‘भुजबळ’ साहेबांच्या तब्येतीची काळजी घे- उद्धव ठाकरे

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील