भय इथले संपत नाही; पुण्यात आज रेकॉर्ड ब्रेक कोरोना रुग्णांची भर !

pune

पुणे : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने रौद्ररुप धारण केले आहे. देशात दररोज १ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. वाढत्या कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच, लसीकरण देखील करण्याचे आवाहन केलं जात आहे.

दरम्यान, देशात सर्वाधिक ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या जिह्यात पुणे जिल्हा अव्वल आहे. अशातच, आज दिवसभरात पुणे शहरात रेकॉर्ड ब्रेक नव्या कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. यामुळे, पुणेकरांच्या चिंतेत वाढ होत असून ऑक्सिजन बेड, साधे बेड यासह इतर आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असल्याचं गंभीर चित्र निर्माण होत आहे.

आज दिवसभरात पुणे शहरात ७ हजार ०१० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पुणे शहरातील एकूण संख्या आता ३ लाख १२ हजार ३८२ इतकी झाली आहे. तर, शहरातील ४ हजार ०९९ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या २ लाख ५७ हजार ८३३ झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ४३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ५ हजार ६१० इतकी झाली आहे. दरम्यान, कोरोना चाचण्यांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :