‘यंदा रेकॉर्ड ब्रेक ऊस उत्पादन होईल’, शरद पवारांचा दावा

sharad pawar

मुंबई : आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवारांनी ‘यंदा रेकॉर्ड ब्रेक ऊस उत्पादन होईल’, असा दावा केला आहे. तसेच १५ दिवसांनी राज्यात साखर कारखाने सुरू होतील. यंदा पाऊस चांगला असल्यामुळे ऊसाचं उत्पादन फार आहे. धरणं भरल्याची स्थिती पाहिली, तर पुढच्या वर्षी ऊसाची लागवड राज्यात अजून जास्त होणार आहे. त्यामुळे यावर्षी आणि पुढच्या वर्षी राज्यात ऊसाच्या उत्पादनाचं रेकॉर्ड ब्रेक होऊ शकेल, असेही ते म्हणाले आहेत.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की,’एकेकाळी मुंबई हे वस्त्रोद्योग व्यवसायाचे देशातले केंद्र होते. सगळीकडे गिरण्याच गिरण्या असायच्या. आज तो गेला. त्याचं कारण गिरण्या बंद झाल्या. कुणीतरी आमच्या सहकाऱ्याने याबाबत चुकीच्या मागण्या केल्या आणि त्यातून या गिरण्या बंद झाल्या. आम्ही आमच्या सहकाऱ्यांना विधिमंडळात सांगत होतो की ताणावं, पण तुटेल इतकं ताणू नये. पण ते ताणलं आणि त्याचा परिणाम आज मुंबईतला, महाराष्ट्रातला कापड धंदा जवळपास संपला आहे.

दरम्यान, ‘ही अवस्था उद्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचं वैभव म्हणून ओळखला जातो, त्या साखर उद्योगाची होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे याबाबत आग्रह करणाऱ्यांनी विचार करावा. चर्चेतून आपण मार्ग काढू शकतो. उत्पादकाला न्याय मिळायला हवा हे आपलं सूत्र आहे,’ असेही यावेळी पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या