प्रभू श्रीरामाची मूर्ती 221 मीटरची असेल तर शिवस्मारकाच्या उंचीचा पुनर्विचार केला जाईल – मेटे

टीम महाराष्ट्र देशा : उत्तर प्रदेशमध्ये प्रभू श्रीरामाचा 221 मीटरचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केल्यानंतर अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या उंचीबाबतही पुर्नविचार केला जाणार असल्याची माहिती शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली आहे.

“उत्तर प्रदेशमध्ये प्रभू श्रीरामाची 221 मीटरची भव्य मूर्ती उभारली जाणार असल्याची माहिती मी वर्तमानपत्रात वाचली. यामध्ये तथ्य असेल तर अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या उंचीबाबतही पुर्नविचार आम्ही करु आणि पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी सरकारकडे करु. शिवाजी महाराज अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यामुळे जगातील सर्वात उंच पुतळा त्यांचा असावा अशी सर्व शिवप्रेमींची भावना आहे” असं विनायक मेटे म्हणाले.

You might also like
Comments
Loading...