उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व सोलापुर विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला असून कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील आणि कुलगुरु प्रा.एन.एन.मालदार यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या.भौतिकशास्त्र विषयात अधिक गुणवत्तापूर्ण संशोधन व्हावे यादृष्टीने हा करार महत्वाचा ठरणार आहे. या करारान्वये पॉलीमर, कंडक्टींग पॉलीमर नॅनो कंपोझाईडस्, नॅनो स्ट्रक्चर मेटल ऑक्साईडस्, नॅनो मटेरियल, सेन्सस्र्, फोटोव्होल्टाइक, व्ही.एल.एस.आय.टेक्नॉलॉजी, वायरलेस् सेन्सींग नेटवर्क आदी विषयाबाबत संशोधन, संशोधनाचे अदान-प्रदान, विद्यार्थ्यांना आवश्यक तेथे प्रशिक्षण, विद्यार्थी आणि शिक्षक यांचे अदान-प्रदान, विश्लेषणात्मक सेवा आणि तंत्रज्ञान हस्तांतरण आदी कार्यक्रम राबविले जाणार आहेत. संशोधनासाठी दोन्ही विद्यापीठाच्या प्रयोगशाळा उपलब्ध करुन दिल्या जातील. काही संयुक्त संशोधन प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. दोन प्रादेशिक विद्यापीठांमधील हा करार महत्वाचा आहे.कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील आणि कुलगुरु प्रा.एन.एन.मालदार यांच्यात या विषयावर अधिक चर्चा होऊन काही नवे प्रकल्प राबविण्याबाबत सहमती दर्शविण्यात आली.