‘पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून मान्यता द्या’, शिवसेना नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

uddhav thackrey

बीड : लोकशाहीच्या चार आधारस्तंभ पैकी एक आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेला कोरोना काळात सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून मान्यता देऊन विमा संरक्षण देऊन सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच लसीकरणासाठी प्राधान्यक्रम देण्यात यावा, अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे वार्ताहर व प्रतिनिधी हे देखील बातम्यांच्या शोधात संपुर्ण राज्यभर फिरत असतात. प्रत्येक जिल्हा, तालुका व गावाची कोविड-१९ त्या संसर्गाबाबतची सद्यस्थिती विविध माध्यमांद्वारे शासनास अवगत करण्याचा प्रयत्न करत असतात.

त्यामुळे पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनीधी यांना फ्रंटलाईन वर्कर्स चा दर्जा देऊन त्यांना लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील सर्व पत्रकारांचे लसीकरणाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. कोरोना काळात अनेक तरुण पत्रकारांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे अशा पत्रकारांसाठी शासनाने सकारात्मक विचार करत सुविधा द्यावी, अशी मागणी क्षीरसागर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP