चालविण्यास दिलेल्या वाहनाचे हप्ते न फेडता परस्पर विक्री

औरंगाबाद : विश्वासावर चालविण्यास दिलेल्या वाहनाचे हप्ते न फेडता त्याची परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शेख शौकत शेख समद (रा. फुलंब्री) याच्याविरुध्द विश्वासघात केल्याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २० जानेवारी २०२० रोजी सेव्हनहिल भागात घडला.

गारखेडा परिसरातील रामेश्वर कचरु शेजूळ (३६, रा. इंदिरानगर) यांनी दोन वाहनांपैकी एक छोटा हत्ती हे वाहन शेख शौकत याला विश्वासावर चालविण्यासाठी दिले होते. या वाहनावर श्रीराम फायनान्स कंपनीचे कर्ज आहे. या वाहनावरील कर्जाचे १७ हप्ते शेजूळ आणि शेख शौकत यांनी भरले.

दरम्यान, वाहन घेऊन जाताना उर्वरीत हप्ते शेख शौकत हे भरतील असा तोंडी व्यवहार झाला होता. त्यानंतरही शेख शौकत याने फायनान्स कंपनीचे हप्ते थकविले. फायनान्स कंपनीचे हप्ते असतानाही शेख शौकत याने वाहनाचा परस्पर खरेदी-विक्रीचा व्यवहार केला. हा प्रकार समोर आल्यावरुन त्याच्याविरुध्द शेजूळ यांनी तक्रार दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास जमादार जाधव करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या