या दंगलीतील खटल्याचा होणार पुनर्तपास

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी १९८४ साली झालेल्या शीखविरोधी दंगलीतील काही खटल्यांचा पुनर्तपास करण्याचे आज (बुधवार) स्पष्ट केले. यासाठी तीन निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करण्याचे सांगितले. या समितीमध्ये उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांसह एक विद्यमान पोलीस अधिकारी आणि निवृत्त पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश असणार आहे. हि समिती १८६ खटल्यांचा पुनर्तपास करेल. तसेच आजपर्यंत ज्या खटल्यांचा तपास विशेष तपास समितीकडून (एसआयटी) मार्फत झाला नव्हता. ते खटले नवीन स्थापन करण्यात आलेल्या समितीकडे पाठवले जातील. सर्वोच्च न्यायालयाच्या दोन निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने दिलेल्या अहवालानंतर सर्वोच्च न्यायालयाने १८६ खटल्यांच्या फेरतपासणीचा निर्णय घेतला.

bagdure

काय होते प्रकरण? 
आक्टोंबर १९८४ ला भरताचे तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकाकडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर देशात दंगली भडकल्या होत्या. ज्यामध्ये २७३३ शीख नागरिकांनवर हल्ला करण्यात आला होता. या दंगलीचे सर्वात जास्त पडसाद दिल्लीमध्ये उमटले होते. दंगलीशी संबंधित २४१ खटले बंद करण्याच्या एसआयटीच्या निर्णयाचा अभ्यास करून हा अहवाल सादर करण्यात आला होता. तर केंद्राने या दंगलीशी संबंधित २५० खटल्यांचा तपास अजूनही सुरू असून २४१ खटल्यांचा तपास बंद करण्यात आल्याचे न्यायालयात सांगितले होते.

You might also like
Comments
Loading...