मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर इतर आमदारांनीही बंड करत शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटात साधारण ४० हून अधिक शिवसेना आमदार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार आणि शिवसेना यांच्यामध्ये दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांना सूचक इशारा दिला आहे. आज सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.
“ते जेव्हा इथे येतील तेव्हा कळेल नक्की बंडखोरी कुठे होणार आहे. अस्वस्थता हा शब्द खूप सौम्य आहे. बंडखोरांमध्ये देखील बंडखोरी होऊ शकते”, अशा सूचक शब्दांत राऊतांनी बंडखोरांना इशारा दिला आहे. तसेच यावेळी संजय राऊत यांनी शहाजी बापू पाटलांना टोला लगावला आहे. “एक आमदार म्हणाला काय झाडी, काय हाटील, काय पाणी, काय डोंगार मग महाराष्ट्रात स्मशान आहे का? तिथे झाडी, फुलं, निसर्ग, दगडं, पाणी आहे, मग तुमच्या महाराष्ट्रात काय आहे, असं म्हणत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला.
“तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावाल, त्यांचे भक्त आहोत असं म्हणाल. पण बाळासाहेबांचे भक्त अशा प्रकारे पाठित खंजीर नाही खुपसणार. जे व्हायचंय ते होऊ द्या. जे करायचंय ते करा. मुंबईत तर यावं लागले ना?”, असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<