नांदेड : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत ४० आमदारांसह बंड केल्यांनतर मुळ शिवसेनेत असलेले नेते आक्रमक होत आहे. शिवसेनेचे (शिवसेना) माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी बंडखोर आमदार आणि खासदारांना इशारा दिला आहे. गद्दार आमदार, खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही व त्यांना शिवसेनेच्या स्टाईलने धडा शिकवल्या जाईल, असे वानखेडे म्हणाले. तसेच पक्ष वाढीसाठी देखील आम्ही गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक हे उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुभाष वानखेडे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर ते नांदेड येथे आले असता कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन येथे त्यांचे भव्य स्वागत केले. त्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करत सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना माजी खासदार यांच्या नेतृत्वाखाली पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेच्या वादावर सुप्रीम कोर्टात १ ऑगस्टला सुनावणी
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि एकनाथ गटात सुरू असलेल्या राजकीय युद्धाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी सर्व पक्षांकडून उत्तरे मागवली आहेत. तसेच या प्रकरणाची सुनावणी १ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमना, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठानेही या प्रकरणाच्या सुनावणीसाठी मोठ्या खंडपीठाची स्थापना करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, याबाबत कोणताही आदेश काढण्यात आला नाही.
उद्धव गटाने दाखल केलेल्या याचिकांवर ही सुनावणी झाली. एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी उद्धव ठाकरे गटाने केली आहे. त्यात राज्यपालांच्या निर्णयालाही आव्हान देण्यात आले आहे, ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण देण्यात आले होते.
लोकसभेतील शिवसेना गटनेतेपदी राहुल शेवाळे
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल शेवाळे यांची लोकसभेतील शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती केली आहे. यासह भावना गवळी या प्रमुख व्हीपपदी कायम राहणार आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लोकसभा अध्यक्षांनी राहुल शेवाळे यांना सभागृह नेते म्हणून मान्यता दिल्याचा दावा केला होता. लोकसभा अध्यक्षांकडे शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांचे अर्ज आले होते.
शिंदे गटाचा शिवसेनेवर केला दावा, आयोगाला लिहिलं पत्र
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेनेवरही आपला दावा ठोकला आहे. शिंदे गटाच्या वतीने निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आले असून, त्यात शिवसेनेची नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांना प्रमुख नेते करण्याबरोबरच अन्य नेतेही निवडून आले आहेत. त्यांची नियुक्तीही प्रभावी ठरली आहे. त्यामुळे जुन्या कार्यकारिणीला आता महत्त्व राहिलेले नाही.
मात्र, गेल्या आठवड्यातच उद्धव ठाकरे गटाने याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. शिवसेनेवर कोणी दावा करत असेल तर उद्धव गटाचा युक्तिवादही ऐकून घ्यावा, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या :
- P. Chidambaram : ED सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठी आहे काय?; नॅशनल हेराल्ड प्रकरणी पी. चिदंबरम यांचा सवाल
- KL Rahul : भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी केएल राहुल करतोय कसून सराव; पाहा ‘हा’ VIDEO!
- jacqueline fernandez | धक्कादायक! जॅकलिन फर्नांडिसला सुकेश तिहार जेलमधून करायचा व्हिडीओ कॉल
- Ramdas Athawale : शिवसेना फोडणारे शरद पवार नसून संजय राऊत होते; रामदास आठवलेंची जोरदार टीका
- vinayak raut : “लोकसभाध्यक्षांनी आमच्या पत्राची दखल न घेता…”, विनायक राऊतांचा गंभीर आरोप
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<