Realme 3 pro चा आज भारतात पहिला सेल ; जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि बेस्ट ऑफर्स

टीम महाराष्ट्र देशा : आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांकडे स्मार्टफोन आहेत. बाजारात देखील याची जोरदार स्पर्धा आहे. नवनव्या फीचर्सची भर टाकून स्मार्टफोन अधिकच स्मार्ट बनवले जात आहेत. Realme कंपनीचा Realme ३ pro या नव्या स्मार्टफोनचा आज भारतात पहिला सेल आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या ई-स्टोरवरून खरेदी करता येणार आहे.

दिल्लीमधील एका इव्हेंटमध्ये काही दिवसांपूर्वीच  Realme 3 pro हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. Realme ३  ची ही पुढील आवृत्ती आहे. लाँच इव्हेंटवेळीच कंपनीने Realme ३  Pro चे दोन व्हेरिअंट्स (४  जीबी रॅम व ६४  जीबी स्टोरेज आणि ६  जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज) बाजारात आणणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण पहिल्या सेलआधीच कंपनीने Realme ३ Pro स्मार्टफोनचं अजून एक व्हेरिअंट सादर केलं. ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असलेलं हे नवं व्हेरिअंट कंपनीने बाजारात आणलं.

कंपनीने मोबाइलच्या खरेदीवर काही खास ऑफर्स देखील दिल्या आहेत. एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना एक हजार रुपयांची सवलत देण्यात आली आहे. ही सवलत ईएमआयवर फोन खरेदी केल्यानंतर मिळणार आहे. हा स्मार्टफोन नो कॉस्ट ईएमआयवरदेखील उपलब्ध आहे. त्याशिवाय फोन खरेदीवर ५३०० रुपयांच्या जिओ वाउचर्सचा फायदा मिळणार आहे. त्याशिवाय मोबिक्विक वॉलेटचा वापर केल्यास १५०० रुपयांची सुपरकॅश ही मिळणार आहे.

किंमत :

Realme ३  Pro (४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज) – १३,९९९  रुपये

Realme ३  Pro (६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज) १५,९९९ रुपये

Realme ३  Pro (६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज)  – १६९९९  रुपये

या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७१० प्रोसेसर असून बॅटरी क्षमता ४०४५ एमएएच आहे. फोन युजर्स तब्बल सात तास पब्जी गेम खेळू शकतात असा दावा कंपनीने केला आहे. त्याशिवाय साडे नऊ तास युट्युब व्हिडिओ पाहू शकतात. त्याशिवाय फोनवर १८.३ तास वेब ब्राउजिंग करू शकतात असाही दावा कंपनीने केला आहे.

फिचर्स :

– कार्बन ग्रे, नाइट्रो ब्लू आणि लाइटनिंग पर्पल रंगामध्ये उपलब्ध
– ड्युअल-सिम
– ६.३ इंची स्क्रीन
– कॉर्निंग गोरिल्ला ग्लास
– ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७१० प्रोसेसर
– डु्युअल रियर कॅमरा
– १६  मेगापिक्सल प्रायमरी कॅमरा
– २५  मेगापिक्सल सेल्फी कॅमरा
– हँडसेट ब्लूटूथ ५.०
– बॅटरी ४०४५ एमएएच