रियालिटी शो मधील स्त्री भूमिकेत जो वल्गरपणा असतो तो त्या भूमिकेत नव्हता – अशोक सराफ

अशी ही बनवाबनवी चित्रपटात सचिन पिळगावकर व लक्ष्मीकांत बेर्डे यांनी स्त्री भूमिका साकारल्या पण त्या भूमिकेची पातळी घसरू दिली नाही. आजकाल कोणत्याही रियालिटी शो मध्ये स्त्री भूमिकेत जो वल्गरपणा असतो तो त्या भूमिकेत नव्हता. असे मत जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले. अशी ही बनवाबनवी या चित्रपटाला २९ वर्षपूर्ण झाल्या निमित्ताने महाराष्ट्र देशाशी ते बोलत होते.

Loading...


कोणतीही अभिजात कलाकुर्ती ही ठरवून होत नसते तर ती आपोआप घडत असते. वसंत सबनीस यांनी कथाच इतकी उत्तम लिहली होती की आमच्या कडून अभिनय देखील तितक्याच तोडीचा झाला. सचिन व लक्ष्मीकांत यांनी स्त्री भूमिकेचा लहेजा इतक्या उत्तमरीतीने सांभाळला की मला त्याचं कौतुक वाटत. चित्रपट यशस्वी होण्याचे मुख्य कारण म्हणजे टीमवर्क ज्यांना टीम वर्क जमल त्यांचा चित्रपट यशस्वी होतो.
बनवाबनवी बनविताना खूप मज्जा आली. वेळ कोठे निघून गेला हे समजल नाही. आम्ही काम करून सुद्धा हा चित्रपट टीव्हीवर लागला तरी अजूनही पाहतो. अशा अनेक आठवणीना अशोक सराफांनी उजाळा दिला.Loading…


Loading…

Loading...