महाराष्ट्रातील विद्यापीठातील वास्तव

students

संदीप कापडे:महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील बोगस कारभार गेले काही दिवस चर्चेत आहे. राज्यातील मुंबई विद्यापीठ ,पुणे विद्यापीठ आणि अमरावती व नागपूर विद्यापीठ मध्ये चालू असलेला गोंधळ पाहता. विद्यार्थ्यांना दर्जाहीन शिक्षण मिळत आहे. शासन याबत गंभीर नसून कोणताही ठोस निर्णय घेण्यात येत नाही. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच सुद्धा या प्रकरणाकडे दुर्लक्ष असल्याचं दिसून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Mumbai-University

मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांचा निकाल वेळेवर न लावल्या मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच भवितव्य टांगणीला लागलं होतं. काही विदयार्थी तर विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या चुकीमुळे आजही बेरोजगार आहेत. न्यायालयाने विद्यापीठाला खडसावले असता,आम्ही माणसे आहोत रोबोट नाही म्हणून विद्यपीठाणे चोराच्या उलट्या बोंबा मारल्या. विद्यापीठाच्या निकालाच्या गोंधळाबद्दल दाखल झालेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टानं मुंबई विद्यापीठ आणि राज्य सरकारला नोटीस जारी केल्या होत्या याबाबत १५ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश कोर्टानं दिले होते. तसेच मुंबई विद्यापीठाने ऑनलाईन पेपर तपासणीची डेडलाईन पाळण्यासाठी चांगली पूर्वतयारी करायला हवी होती, हे सगळं तर नोटबंदीसारखं झालंय अशी टिप्पणीही केली. विद्यार्थ्यांनी पूर्ण शैक्षणिक शुल्क भरून सुद्धा विद्यापीठाकडून मानसिक त्रास देण्यात येतो त्यामुळे विद्यापीठाच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एकीकडे सरकार वेगवेगळ्या शैक्षणिक धोरण राबविते. तर दुसरीकडे मात्र विद्यापीठाच्या सावळ्या गोंधळाकडे दुर्लक्ष करीत आहे. विद्यापीठाच्या सर्व म्हणजे ४७७ पदवी परीक्षाच्या उत्तरप्रत्रिकांची तपासणी ऑनलाइन करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांचा या संपूर्ण गोंधळाला कारणीभूत आहे. त्यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी राज्यपाल सी.एच. विद्यासागर राव यांना मुंबई विद्यापीठाचे कुलपती या नात्याने पत्र लिहिले होते त्यात त्यांनी कुलगुरू देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती.

department-of-computer-science-sgb-amravati-university

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात असाच प्रकार सुरू आहे. विद्यापीठाच्या बोगस कारभारामुळे व कुलगुरूनी स्वतःच्या मुलीचे गुणवाढ केल्या मुळे खुद्द मुख्यमंत्र्यांनी 2016 च्या दीक्षांत समारंभात येण्याचे टाळले होते. विद्यार्थ्यांचे निकाल लेट लावणे, विदयार्थी परीक्षेला हजर असले तरी मार्कशीट वर गैरहजर दाखवणे. विद्यापीठाच्या परीक्षा संचालकाच्या बेजबाबदार पणाला कंटाळून विद्यार्थांनी विद्यापीठाच्या गेट समोर रक्त स्वाक्षरी अभियान राबवले याला भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरोधात शैक्षणिक क्रांती म्हणावे लागेल. अमरावती विद्यापीठात अधिकारी एवढे सुस्त आणि आळशी आहेत की त्यांच्या आळशीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. काही दिवसाआधी विद्यापीठातील कर्मचारी कामावर असतांना अश्लील व्हिडीओ पहात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. विद्यापीठात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शैक्षणिक कामासाठी येतात मात्र अधिकाऱ्याच्या सुस्तपणामुळे त्यांना नाहक त्रास होतो.

uni pune

देशात दहावे आणि राज्यात पहिलं असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुद्धा गंभीर प्रकरण समोर आले आहेत. 65 हजार रुपये द्या आणि रीचेकिंग मध्ये पास अशी टोळी विद्यापीठात असल्याची चर्चा सुरू असून यात परीक्षा विभागातील कर्मचारी सुद्धा सहभागी असल्याची शंका व्यक्त होत आहे.विद्यापीठाच्या हलगर्जी पणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून विद्यापीठ प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. एक प्रकरण मिटले की परत दूसरे प्रकरण विद्यापीठात पहायला मिळते. कित्येक निवेदन देऊन सुद्धा विद्यापीठ दुर्लक्ष करते. मध्यंतरी एमआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊनही विद्यापीठाने त्यांना मार्कशीट वर गैरहजर दाखवले होते. असाच प्रकार खेड शिवापूर येथील फ्लोरा इंस्टीट्युट मधील 150 विद्यार्थ्यांसोबत सुद्धा झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास झाला होता. काही विद्यार्थ्यांचे प्रवेश सुद्धा रखडले होते. शहरातील 120 एमबीए कॉलेजच्या विद्यार्थ्यांना चक्क एका वर्षांनांतर मार्कशीट देण्यात आल्या. छपाईसाठी कागद नसल्याचे कारण त्यावेळी विद्यापीठाकडून सांगण्यात आले होते. येत्या हिवाळी अधिवेशनात कुलगुरु नितीन कळमकर यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याची विद्यार्थो संघटनांमध्ये चर्चा सुरू आहे.

nagpur-university_1

नागपूर मधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ पण यात काही कमी नाही काही महिन्यापूर्वी विद्यापीठात काचाडोह प्रकरण चांगलंच गाजलं होत. कुलचिव संध्या चुनोडकर यांनी स्वतःच्या मुलाचे गुणवाढ केले होते त्याचा फायदा इतर विद्यार्थांना सुद्धा झाला होता. आता तब्बल 5 वर्षांनी चुनोडकर यांना सेवेतून बरखास्त करण्यात आलेे. मात्र आजपर्यंत या प्रकरणाची पोलीस तक्रार न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. विद्यापीठातील ही गंभीर बाब असून तक्रार न केल्यामुळे एकप्रकारे भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठिंबा मिळत असल्याची विद्यापीठ वर्तुळात चर्चा आहे.महाराष्ट्रातील प्रमुख चार विद्यापीठात सर्व ठिकाणी एकच परिस्थिती आहे. शिक्षण क्षेत्रातील हे गंभीर वास्तव असून शिक्षणाचा खुलेआम बाजार मांडला आहे.