६ ऑगस्ट पासून मनसेचे मल्टिप्लेक्समध्ये रिऍलिटी ‘कान’ चेक

टीम महाराष्ट्र देशा : मल्टीप्लेक्स थियेटरमध्ये खाद्यपदार्थांचे अवाजवी दर लावले जातात. त्याविरोधात मनसेने आक्रमक आंदोलन केले होते. पुण्यात एका मल्टिप्लेक्स मॅनेजरला मनसे नेते किशोर शिंदे यांनी मनसे स्टाईलने  समजावल्यानंतर थिएटर चालकांनी नरमती भूमिका घेतली आणि अवाजवी दरणावर नियंत्रण आणण्याचे आश्वसन दिले होते.
काल पासून राज्यभरात नव्या दरांची अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. मात्र अजून तस होताना दिसत नसल्याने आता मनसे या दरांचे रिऍलिटी चेक करणार आहे.
यासंदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोमवार दिनांक 6 ऑगस्ट पासून महाराष्ट्र सैनिक सर्व मल्टि प्लेक्स मध्ये जाऊन शासनाच्या आदेशाची अंंमलबजावणी होते आहे की नाही याचा रिऍलिटी ‘कान’ चेक करतील याची नोंद घ्यावी अस स्पष्ट केलं आहे.

मतदानापुर्वींंचा शेवटचा रविवार भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावला सार्थकी

मराठा आरक्षण : सुनीता गडाख यांचा पंचायत समिती सभापती पदाचा राजीनामा !

You might also like
Comments
Loading...